शरीरातील व्यंगालाच बनवली आपली ताकद; 45 किलोचा पाय असलेल्या मॉडेलचा थक्क करणारा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरातील एखाद्या व्यंगामुळे काहीजण दैवाला आणि देवाला दोष देत बसतात. मात्र, काहीजण ते व्यंग स्वीकारून परिस्थितीवर मात करतात. आपल्या व्यंगालाच ते आपले सामर्थ्यस्थळ बनवून ती आपली ताकद बनवतात. असेच एक उदाहण अमेरिकेतील महोगनी गेटर या मॉडेलचे आहे. ही मॉडेलमध्ये शारीरिक व्यंग आहे. मात्र, ते व्यंग न झाकता, फोटोशूट करताना, ती त्या व्यंगाचा कलात्मकेतेने योग्य तो उपयोग करून घेते. त्यामुळे या मॉडेलची चर्चा आहे. काहीजण तिला ट्रोलही करतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत तिचा प्रवास सुरू आहे.

महोगनी 23 वर्षांची असून ती जन्मजात लिम्फेडेमा नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. लिम्फेटिक सिस्टीममध्ये असलेल्या ब्लॉकेजमुळे ही समस्या होते. या आजारात शरीराच्या एका भागाला कायम सूज असते. त्यावर कोणताही उपाय नाही. या आजाराने महोगनीचा डाव पाय नेहमी सूजलेला असतो. तिच्या डाव्या पायाचे वजन तब्बल 45 किलो आहे.

शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त असल्याचे तिने सांगितले. अनेकदा होणाऱ्या टीकेने किंवा ट्रोलने व्यथीत होते. मात्र, हे माझे व्यंग नसून हीच माझी ताकद आहे, असे मी मनाला समजावते आणि कामाला सुरुवात करते, असे महोगनीने सांगितले. काही ट्रोलर्सनी आपल्याला सर्वसामान्यांसारखे दिसण्यासाठी पाय कापण्याचा सल्लाही दिला. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करत असून या व्यंगासह या व्यंगालाच आपली ताकद बनवत जगणे शिकली आहे, असे ती सांगते. तसेच ट्रोलर्सलाही ती सुनावते.

आपले व्यंग लपवण्यापेक्षा त्याचा वापर कसा करता येईल, याचा मी विचार केला. या माझ्या व्यंगामुळे मला या आजाराबाबत जमजागृती करता येत आहे. या व्यंगातून आपण लिम्फेडेयाबाबत जागृती करत असल्याचे तिने सांगितले. आपल्या आयुष्याचे हे अक ध्येय असल्याचे तिने सांगितले. हे काम अजून व्यापक करायचे आहे, असे ती म्हणाली. या आजाराबाबत माझी आईला माझी चिंता असायची. तिच्याकडून प्रेरणा घेत हे काम पुढे नेत असल्याचे तिने सांगितले.