मॉडेलचा नकोसा व्हिडीओ केला व्हायरल, ऍप्सवरून झाली ओळख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sad-girl

मॉडेलचा नकोसा व्हिडीओ व्हायरल करून तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार या मॉडेल आहेत. त्यांची ऍप्सवरून एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्याने आपण आखाती देशात कामाला असल्याचे तिला सांगितले. ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. त्याने तिचे काही व्हिडीओ घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी तो तिला ब्लॅकमेल करू लागला असा तिचा आरोप आहे. व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्याकडे पैसे मागू लागला. अखेर तिने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासाकरिता सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे.