मोदी समर्थकाची अतिशयोक्ती, सुरीने छातीवर कोरले मोदींचे नाव

93

सामना ऑनलाईन । पाटणा

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. आपल्या लाडक्या नेत्यासाठी अनुयायी, समर्थक काय करतील याचा नेम नसतो. बिहारमध्ये मोदींच्या चाहत्याने चक्क आपल्या छातीवर मोदींचे नाव सुरीने कोरले आहे. हा कुठलाही टॅटू नसून खरंच त्याने चाकूने मोदींचे नाव कोरले आहे.

सोनू पटेल असे या मोदी अनुयायाने नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गुरूवारी निकाल जाहीर झाल्यानंतर सोनूने आपल्या भागात मिठाई वाटली. नंतर सुरी घेऊन आपल्या छातीवर मोदींचे नाव कोरले. त्यात मोठ्या रक्तस्रावही झाला. त्यानंतरही सोनू रडत नव्हता, त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होते.

मोदी हे देशाचे भविष्य आहेत, ते देशाच्या सुरक्षेसाठी नेहमीच तयार असतात आपणही त्यांच्यासाठी त्याग केले पाहिजे असे मत सोनुने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या