मोदींच्या फोटो फ्रेमला 1 कोटी, पंतप्रधानांच्या भेट वस्तूंचा लिलाव उत्साहात

306

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाला उदंड असा प्रतिसाद लाभला आहे. मोदी यांना भेट मिळालेल्या फोटो फ्रेमसाठी तब्बल एक कोटी रुपये मोजण्याची तयारी एका खरेदीदाराने दाखवली आहे. शिवाय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी पंतप्रधानांना भेट दिलेल्या चांदीच्या कलशासाठीही एक कोटी रुपये देण्याची तयारी दुसर्‍या खरेदीदाराने दाखवली आहे. मोदी यांना जनता आणि राजकीय सहकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तू खरेदीसाठी आयोजित ई-लिलावाला देशविदेशातून मोठा प्रतिसाद लाभला आहे.

यंदा पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या 2,272 भेटवस्तू दिल्लीतील मॉडर्न आर्ट गॅलरीत लिलावात सहभागी होणार्‍या नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुरू केलेल्या भेटवस्तूंच्या लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या लिलावात पंतप्रधानांना भेटीदाखल मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये शाल, जॅकेटस्, पोर्ट्रेटस्, तलवारी आणि पगडय़ा अशा वस्तूंचा समावेश आहे.

मायेची गुजराती थाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी  अहमदाबाद येथील आपल्या निवासस्थानी जाऊन आई हिराबा यांचे आशीर्वाद घेतले. आईच्या आग्रहाखातर त्यांनी घरातील  मायेच्या गुजराती थाळीचाही आस्वाद घेत आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या