
जुहू विलेपार्ले जिमखाना आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने फार्मात असलेल्या मुंबईच्या माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरेचा सरळ दोन सेटमध्ये 20-13, 25-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महिलांच्या उप उपांत्य सामन्यात मुंबईच्या अंबिका हरिथने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला 19-16, 3-25, 17-13 असे हरवून आपली घोडदौड कायम राखली. तसेच पुण्याच्या अभिजीत त्रिपणकरने विकास वारियाचा 13-7, 24-7 असा पराभव केला.