37 चेंडूंत शतक झळकावणारा मोहम्मद अझरुद्दीन कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

26 वर्षीय मोहम्मद अझरुद्दीन याने बुधवारी रात्री सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत धमाकेदार शतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या 37 चेंडूंत शतकी खेळीचा धमाका केला. मोहम्मद अझरुद्दीनच्या 54 चेंडूंतील नाबाद 137 धावांच्या खेळीच्या जोरावर केरळ संघाने मुंबईचा त्यांच्याच घरात 8 गडी व 25 चेंडू राखून धुव्वा उडवला.

मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म 1994 साली थलानगरा येथे झाला. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन त्यावेळेला फॉर्ममध्ये होता. त्यामुळे मोठा भाऊ कमरुद्दीन याने लहान भावाचे नाव मोहम्मद अझरुद्दीन ठेवले. याच मोहम्मद अझरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील सर्वात दुसरे वेगवान शतक झळकावले. तसेच केरळसाठी टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा मोहम्मद अझरुद्दीन पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खेळीत त्याने 11 गगनभेदी षटकार व 9 झंझावाती चौकार चोपून काढले.