टिव्ही अभिनेत्रीला कोरोनाची लागण, घरातील 21 जण निघाले पॉझिटिव्ह

5085

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री मोहेना कुमारी हिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये राहाणाऱ्या या अभिनेत्रीच्या कुटुंबातील पाच जणांना व घरातील 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना हरिद्वारमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोहेना कुमारी ही उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. मोहेनाच्या घरातील तिचे पती, सासरे, जाऊ, दीर, व त्यांचा लहान मुलगा श्रेयांश यांना कोरोनाची लागण झाली आहे. घरातल्या सदस्यांव्यतिरिक्त त्यांच्या घरात काम करणाऱ्या 15 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. सर्वात आधी मोहेनाची सासू अमृता रावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर घरातील 41 जणांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

मोहेना कुमारी हिचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुयश रावत याच्यासोबत विवाह झाला होता. मोहेना ही डान्स शोमधून टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आली होती. तिने अनेक डान्सच्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तसेच ती ये रिश्ता क्या केहलाता है मालिकेतही काम कलेेल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या