उरण : पिसाळलेलं माकड पिंजऱ्यात कैद, २५ जणांना घेतला होता चावा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । उरण
रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या माकडाला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या माकडाने २५ जणांना चावा घेतल्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. माकडाला पकडण्यासाठी उरण वनविभागाकडे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या मात्र माकड काही आटोक्यात येत नव्हते. मात्र बुधवारी वनवीभागाने लावलेल्या साफळ्यात अखेर हे माकड अडकले असून, त्याला पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात सोडण्यात आले आहे.
गेले काही महिन्यांपासून हे माकड उरण शहरात सहज वावरताना दिसत होते. नागरिक या माकडाला आवडीने खाऊ देत असल्याने ते चांगलेच धष्टपुष्ट झाले होते. मात्र  काही दिवसांपासून या माकडाने नागरीकांना लक्ष करायला सुरुवात केली होती. त्याने शहरातील २५ जणांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती. माकडाच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने याची वनविभागाला माहिती देऊन त्याचा बंदोबस्कत करण्याची मागणी होत होती. अनेक वेळा साफळे लाऊन देखील माकडाला पकडण्यात वनविभागाला यश मिळत नव्हते. त्यामुळे वनविभागाने मुंबईहुन एक विशेष पथक या माकडाला पकडण्यासाठी बोलावलं होतं. माकडाला पकडल्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.