नशिबानं कमावलं, माकडानं पळवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आतापर्यंत आपण माकडांचे अनेक किस्से ऐकले आहेत. अशीच एक घटना आग्रा येथे घडल्याचं समोर आलं आहे. दोन माकडांनी तब्बल २ लाखांची रुपयांची रोकड लंपास केली.

आग्रा येथे सोमवारी न्हाई मंडी हलका मदन इथे राहणाऱ्या सराफ विजय बंसल यांच्यासोबत ही घटना घडली आहे. विजय यांची पत्नी रेनु आणि त्यांची मुलगी नॅन्सी धाकरान चौकामध्ये इंडियन ओवरसीज बँकेत दोन लाख रुपये जमा करण्यासाठी जात होते. बँकेच्या आवारात पोहोचताच दोन माकडांनी मुलीच्या हातातली पैशांची पिशवी हिसकाऊन घेतली आणि पळत सुटले. लोकांनी आरडाओरडा करताच बँकेतले गार्ड आणि तिथे उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माकडांच्या मागे धाव घेतली. माकड पिशवी घेऊन पळत असताना काही पैशांचे बंडल माकडाने फेकले.त्या फेकलेल्या बंडल मधील पैसे विजय बंसल यानं कसेबसे जमा केले.

तब्बल एक तासाच्या धावपळीनंतर हा सगळा प्रकार थांबला. पण तोपर्यंत पैशांच्या चुराडा झाला होता. माकडांनी पिशव्या लंपास केल्यानंतर पिशवी मधली पैशांची बंडलं काढून ती फाडली आणि नोटा हवेत उडवल्या. हे दृश बघताच सराफांच्या काळजाचा ठोका चुकला. माकडांनी ती पिशवी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फेकून दिली आणि तिथून पळ काढला. आश्चर्य म्हणजे सराफांना ती रक्कम मिळालीच नाही. त्यांच म्हण असं आहे की, लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात आसल्यानं ती पैशांची पिशवी अज्ञतांनी लंपास केली असावी.