
कोकणात मॉन्सून 10 जूनपासून बरसणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असतानाच संगमेश्वर तालुक्यात सोमवारी सकाळी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. सोमवारी सकाळी तालुक्याच्या सर्व भागात सुमारे एक तास दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतांमधून उखळबेरीची कामे सुरु केली आहेत. रोहिणी नक्षत्राची सुरुवात होताच शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करुन घेतल्याने तालुक्यातील शेतांमधून वाढलेली भात रोपे दिसत आहेत. ठिकठिकाणी वाढलेल्या भात रोपांची वाढ चांगली होत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
































































