उशीरा आलेला मान्सून कोकणात ‘रेनरेट’ भरून काढतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

गेले पंधरा दिवस पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या रत्नागिरीकरांना मान्सूनने झोडपायला सुरुवात केली आहे. 25 जून पर्यंत अतिशय तुरळक पडलेल्या पावसाने आपला ‘रेनरेट’ एका दिवसात भरून काढला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 112.33 मिमी पाऊस पडला. दापोली तालुक्यात सर्वाधिक 210 मिमी पाऊस पडला.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. मंडणगड 127 येथे मिमी, दापोलीत 210 मिमी, खेड 124 मिमी, गुहागर 83 मिमी, चिपळूण 105 मिमी, संगमेश्वर 84 मिमी, रत्नागिरी 88 मिमी, लांजा 90 मिमी, राजापुरात 100 मिमी पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.