पावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…

496

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसाळ्यात चिखल आणि सांडलेल्या ऑईलमुळे रस्ते निसरडे झालेले असतात. अशा वेळी गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहन चालकांनी याची काळजी घेण्याची आवश्यकता असते. यामुळे पावसाळ्यात अपघात टाळण्यास मदत होईल. दुचाकी आणि चारचाकी चालवताना अशी घ्या काळजी…

> मुसळधार पावसात दिवसादेखील हेडलाइटचा वापर करावा

> कार चालक, बसचालक, ट्रक चालकाने अपघात टाळण्यासाठी वायपर्सचा वापर करावा व वाहनाच्या समोरील काचा नेहमी स्वच्छ ठेवाव्यात

> वाहनाच्या मागील बाजूस लाल परावर्तक व वाहनाच्या पुढील बाजूस पांढरे परावर्तक लावणे गरजेचे आहे.

> पावसाळ्यात वाहनाचे ब्रेकस, हेडलाइट, ब्रेकलाइट्स सुस्थितीत असावेत

> वाहन पाण्यातून नेण्यापूर्वी शक्यतो पहिल्या गिअरमध्ये ठेवा, तसेच पाण्यात वाहन असताना गिअर बदलू नका आणि वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवा.

> दुचाकी अगर चार चाकी वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करू नका

> दुचाकी वाहन चालवताना वाहन चालकांनी हेलमेटचा वापर करावा

> वाहन चालकांनी मद्य, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये

> ओव्हरटेक करताना वाहनांची समोरा समोर धडक होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी इर्षेने ओव्हरटेक करू नका

आपली प्रतिक्रिया द्या