
प्रदीर्घकालावधीनंतर आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, कोल्हापूरसह नगरमध्ये मान्सूनच्या पावसाने सुरुवात केली. त्यामुळे खोळंबलेल्या शेतीकामांना सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला. या पावसामध्ये आबालवृद्धांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्याने लोकांची तारांबळ उडली.
सोलापुरात घरांमध्ये पाणी शिरले
सोलापूर शहरात तब्बल 22 दिकसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आषाढी कारीच्या निमित्त संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात आली आणि मंगळवेढय़ात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिह्यात दाखल झाली आणि अकलूज भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाली.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि सुरुकातीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील नाले ओव्हरफ्लो झाले, तर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे दृश्य दिसत होते. शहरात सखल भागांतील घरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. पहिला पाऊस अंगाकर पडताच शाळकरी मुलांनी नाचून आनंद क्यक्त केला. त्यानंतर हळूहळू मुसळधार अशा पावसाला सुरुवात झाली.
साताऱ्यात 87 मि.मी.पावसाची नोंद
केवळ शेतकरीच नव्हे, तर तमाम जनता ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, तो मान्सून आज सातारा जिह्यात बरसला. महाबळेश्वरला मान्सूनने पदार्पणातच दमदार ‘बॅटिंग’ केली. कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाची एण्ट्री समाधानकारक झाली.
जून महिना संपत आला तरी मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जनता कासावीस झाली होती. चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेला मान्सूनच्या आगमनाने आज सुखद धक्का दिला. दुपारपासून जिह्यात सर्वदूर मान्सूनच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या व वातावरण बदलून गेले. पाटण, कराड, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावली तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस सुरू झाला असून, दुष्काळी पट्टय़ात फलटण, खटाव, माण तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. या धरणांच्या पाणलोटक्षेत्रात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगरला 49, नवजाला 44, तर महाबळेश्वरला 87 मिलिमीटर पाऊस पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजता 10.68 टीएमसीवर असलेला पाणीसाठा 10.75 टीएमसी झाला आहे. म्हणजेच धरणातील पाणीसाठय़ाचा घसरणीच्या दिशेने चाललेला प्रवास थांबून भरण्याच्या दिशेने सुरू झाला आहे.
राधानगरी तालुक्यात पेरणीला सुरुवात
तालुक्यात सध्या पेरणीची धांदल सुरू असलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतीशिवार अगदी माणसांनी गजबजून गेले आहे. मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेले; परंतु आर्द्रा नक्षत्राचा या परिसरात चांगला पाऊस सुरू झाला आहे.
यावेळी नेहमीपेक्षा जास्त क्षेत्र पेरले जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 25 टक्के शेती डोंगरक्षेत्रात आहे. या क्षेत्रातील शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेले 15 दिवस पावसाने ओढ दिल्याने हे शेतकरी चिंतेत होते; परंतु परवापासून वरुणराजाने चांगली ‘बॅटिंग’ केल्याने वाडय़ा-वस्त्यांवर सध्या पेरणीची लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.
थोडय़ाच पावसाने नगरमध्ये पाणी साचले
नगर शहरामध्ये आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील खड्डय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचले होते.
गेल्या तीन दिवसांपासून हवामानामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये बदल जाणवू लागला होता. पाऊस लांबल्यामुळे शेतकरीवर्गसुद्धा चिंतेमध्ये सापडलेला होता. पावसाची वाट सर्वजण पाहत होत़े आज दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. आज नगर शहर, तसेच उपनगरामध्येसुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले दिसून आले.
खड्डे न बुजविल्यामुळे, तसेच महापालिकेची कामे पूर्णत्वाला न गेल्यामुळे त्याचा फटका आता या पावसाळ्यामध्ये बसू लागलेला आहे. नगर शहराच्या दुरवस्थेबद्दल नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले. यामध्ये त्यांनी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे या प्रश्नांकडे लक्ष वेधले.





























































