जीवे मारण्याची धमकी देत गर्लफ्रेंडने केला एक्स बॉयफ्रेंडवर बलात्कार

4878

महिलांवरील बलात्काराच्या बातम्या सर्रास आपण ऐकत असतो. मात्र हल्ली पुरुषांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत चालली आहे. अमेरिकेतील मोन्टाना येथे एका तरुणीने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या तरुणीला स्थानिक न्यायालयाने 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

मोन्टाना येथे राहणाऱ्या समांथा स्मिअर्स हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांनी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर काही दिवस ते दोघे वेगळे राहिले मात्र समांथाला त्याला भेटायची फार इच्छा झाली. मात्र तो तिला भेटायला नकार देत होता. समांथाकडे तिच्या बॉयफ्रेंडच्या घराच्या चाव्या होत्या. तिने तो नसताना कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला. ज्यावेळी तो आला तिने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर ती कुऱ्हाड तिने त्याच्या मानेवर धरत त्या जबरदस्ती सेक्स करण्यास भाग पाडले. त्यानंतर ती बराच वेळ त्याच्याच घराच्या सोफ्यावर बसून होते. तेव्हा त्याने तिचे हातात कुऱ्हाड असलेले काही फोटो क्लिक केले व तिथून पळून गेला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. दरम्यान समांथाने कऱ्हाडीच्या सहाय्याने त्याच्या घरात प्रचंड नासधूस केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी समांथाला अटक केल्यानंतर तिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्य़ात आला. समांथाने तिच्या बॉयफ्रेंडच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावले होते. तसेच त्याचा बराच छळही केला होता. त्याच्या घराचेही तिने बरेच नुकसान केले होते. त्यामुळे न्यायालयाने तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या