हिंदुस्थानचा विकासदर घटणार; कर्जाचा बोजाही वाढणार

270

रिझर्व्ह बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता रेटिंग एजन्सी ‘मुडीज’नेही 2019-20 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानचा विकासदर घटणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हिंदुस्थानचे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) 5.8 टक्क्यांपर्यंत खाली येईल. सरकारची वित्तीय तूट वाढेल. परिणामी कर्जाचा बोजा वाढेल असेही ‘मूडीज’ने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवडय़ात जीडीपी 6.1 टक्क्यांपर्यंत खाली येईल असे म्हटले आहे.

मुघल आणि ब्रिटीशांमुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ढासळली – योगी आदित्यनाथ

 

काय आहेत कारणे?

हिंदुस्थानातील अर्थव्यवस्थेच्या सुस्तीमागे अनेक कारणे आहेत. मात्र, प्रामुख्याने देशांतर्गत कारणे असून, त्याचा परिणाम दिर्घकालीन असणार आहे.

हिंदुस्थानचा जीडीपी 8 टक्के होण्याची शक्यता होती. मात्र, गुंतवणुकीत आलेली सुस्ती, मागणीमध्ये घट, ग्रामीण क्षेत्रावर वाढलेला आर्थिक दबाव, अल्पप्रमाणात रोजगार निर्मिती आणि वित्त संस्थांकडे निधीची चणचण आदी समस्यांचा गंभीर प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडला आहे.

सरकारची वित्तीय तूट सध्या 3.7 टक्के आहे. 2019-20 आर्थिक वर्षात ही तूट आणखी 0.4 टक्क्यांनी वाढेल. कर्जाचा बोजा वाढविण्यावरही परिणाम होईल. सरकारने नुकताच कार्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 1.5 लाख कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर वाढेल. 2020-21 मध्ये जीडीपी 6.6 टक्के होईल. काही वर्षात 7 टक्क्यांपर्यंत वाढेल.

आपली प्रतिक्रिया द्या