तोंडाला काळ्य़ा पट्टय़ा लावून नाणार प्रकल्पाचा निषेध

15

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

निसर्गरम्य कोकणचा विनाश करणारा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प भाजप सरकार कोकणवासीयांच्या माथी मारत असताना नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलन आता अधिकच पेटू लागले आहे. नाणारसह 14 गावांतून सुरू झालेले आंदोलन राजापुरातून थेट रत्नागिरीपर्यंत पोहचले. शिवसेनेने आज शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या विरोधात लाँगमार्च काढला.

शिवसैनिकांसह शेतकरी आणि मच्छीमारांनी तोंडाला काळय़ा पट्टय़ा बांधून या विनाशकारी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाचा विरोध केला. शिवसेना शाखा साळवी स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधातील फलक आणि भगवा झेंडा हातात घेऊन शिवसैनिकांसह मच्छीमार आणि शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या