मुंबईतील प्रवाशांची स्मार्ट तिकीटाला पसंती; उत्पन्नात 31.58 टक्क्यांचा वाटा

मुंबईतील प्रवाशांची स्मार्ट तिकीटाला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 1 जानेवारी ते 26 मे 2023 पर्यंत तिकिटांच्या बुकिंगसाठी सुमारे 25.23% प्रवाशांनी मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲप आणि ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स (ATVM) वापरल्या आहेत. मुंबई विभागातील एकूण तिकीट विक्रीच्या कमाईत UTS ॲप आणि ATVM चा वाटा 31.58% आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रवाशांमध्ये यूटीएस ॲप आणि एटीव्हीएमची लोकप्रियता वाढत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये UTS तिकिटांच्या वापरामध्ये 1 जानेवारी-2023 ते 26 मे 2023 पर्यंत वाढ दिसून आली असून 13.93 कोटी प्रवाशांनी दैनंदिन सरासरी 9.61 लाख लोक ही सुविधा वापरत आहेत.

मुंबई विभागातील कमाईचे तपशील 
स्टेशन विंडो, UTS ॲप आणि ATVM द्वारे बुक केलेल्या एकूण तिकिटांची संख्या : 55.29 कोटी
स्टेशन विंडो, UTS ॲप आणि ATVM द्वारे बुक केलेल्या तिकिटांमधून एकूण कमाई : 525.42 कोटी
UTS ॲप आणि ATVM वापरणारे एकूण प्रवासी : 13.93 कोटी
UTS ॲप आणि ATVM द्वारे बुक केलेल्या तिकिटांमधून एकूण कमाई : 165.97

स्टेशन खिडक्या, UTS ॲप आणि ATVM द्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांची दैनिक सरासरी : 38.09 लाख
UTS ॲप आणि ATVM वापरणाऱ्या प्रवाशांची दैनिक सरासरी : 9.61 लाख
स्टेशन खिडक्या, UTS ॲप आणि ATVM द्वारे बुक केलेल्या तिकिटांमधून दररोज सरासरी कमाई : 3.62 कोटी
UTS ॲप आणि ATVM द्वारे बुक केलेल्या तिकिटांमधून दररोज सरासरी कमाई : 1.14 कोटी

दररोज UTS ॲप आणि ATVM वापरणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी: 25.23 %
UTS ॲप आणि एटीव्हीएमद्वारे दररोज बुक केलेल्या तिकिटांमधून मिळणाऱ्या कमाईची टक्केवारी : 31.58%