
सामना ऑनलाईन,मुंबई
जोगेश्वरीच्या ‘मातोश्री मीनाताई ठाकरे’ शिल्पग्राममध्ये लवकरच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. रविवारी 25 हजारांवर पर्यटक-रहिवासी आल्यामुळे उडालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत आजच दैनिक ‘सामना’मध्ये शिल्पग्राममध्ये सुरक्षा नसल्यामुळे उडालेल्या गोंधळाबाबत वृत्त प्रकाशित झाले होते.
बारा बलुतेदारांसह महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे शिल्पग्राम शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे साकारले आहे. अलीकडेच लोकार्पण झालेल्या या शिल्पग्राममध्ये रविवारी 25 हजारांवर पर्यटक आल्याने एकच गोंधळ उडाला. काही उपद्रवींनी या ठिकाणच्या वास्तू आणि झाडांची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्रचंड गर्दीत आठ लहान मुलेही हरवली. शिवसेना नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांनी केलेल्या मदतकार्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शिवाय शिवसैनिकांनी हरवलेल्या मुलांना सुखरूप घरीही पोहचवले. यामुळे शिल्पग्राममध्ये सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणीही नर यांनी केली होती.
शिल्पे, खेळणी, कारंजांचे आकर्षण
3 लाख 70 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळावर साकारण्यात आलेल्या या शिल्पग्राममध्ये किकिध कलाकौशल्यांची ओळख करून देणारी शिल्पे, संगीत कारंजांसह कृक्ष, शोभेची झाडे, केलीदेखील आहेत.
त्याचबरोबर लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, मेरी-गो-राऊंड यासारखी किकिध खेळणीदेखील या ठिकाणी आहेत. शिवाय किकिध हिंदुस्थानी नृत्यशैलींची ओळख करून देणाऱ्या कथ्थक, भरतनाटय़म्, कुचीपुडी, भांगडा, गरबा, लावणीच्या शिल्पांचाही समावेश या ठिकाणी आहे.
‘शिल्पग्राम’ सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 या कालाकधीत सर्क नागरिकांसाठी खुले असते. त्यामुळे या ठिकाणी रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुविधेसाठी अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी सांगितले.


























































