
राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. राज्यात आतायर्पंत 11 लाख 62 हजार 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्यांवर पोहोचले आहे. सध्या 2 लाख 52 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सोमवारी 263 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 71 लाख 69 हजार 887 नमुन्यांपैकी 14 लाख 53 हजार 653 नमुने पॉझिटिव्ह ( 20.27टक्के) आले आहेत. राज्यात 22 लाख 160 लोक होम क्कारंटाईनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 749 लोक संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 1,813 कोरोना रुग्ण
मुंबईत सोमवारी दिवसभरात 1,813 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 3,502 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 79,519 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 47 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 47 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 152 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 65 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 24 हजार 199 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 11 लाख 78 हजार 111 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 465 वर पोहोचली आहे.
देशात कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 55 लाख 86 हजार 703
कोराना संसर्गातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 दिवसांपर्यंत 10 लाखांच्या खाली गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी आपल्या निवेदनात दिली. गेल्या चोवीस तासांत देशात 76 हजार 737 जण कोरानातून मुक्त झाल्याची नोंद झाली आहे तर याच काळात 74 हजार 442 नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज देशात कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 55 लाख 86 हजार 703 इतकी झाली आहे. एका दिवसात कोरोनातून बरे होणाऱ्य़ांची संख्या अधिक असल्यामुळे नॅशनल रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.


























































