महाराष्ट्रातून 11 लाख 86 हजार 212 परप्रांतीय मूळ गावी रवाना – गृहमंत्री अनिल देशमुख

520
anil-deshmukh

महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना स्वगृही परत पाठवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 1 मे ते 1 जून या महिन्याभरात सुमारे 11 लाख 86 हजार 212 परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले. यासाठी 822 विशेष श्रमिक ट्रेन राज्यातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 450, बिहारमध्ये 177, मध्यप्रदेशमध्ये 34, झारखंडमध्ये 32, कर्नाटकमध्ये 6, ओदिशामध्ये 17, राजस्थानमध्ये 20, पश्चिम बंगालमध्ये 47, छत्तीसगडमध्ये 6 यासह इतर राज्यांमध्ये एकूण 822 ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध रेल्वे स्थानकातून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून 136, लोकमान्य टिळक टर्मिनल 154, पनवेल 45, भिवंडी 11, बोरीवली 71, कल्याण 14, ठाणे 37, बांद्रा टर्मिनल 64, पुणे 78, कोल्हापूर 25, सातारा 14, औरंगाबाद 12, नागपुर 14 यासह राज्यातील इतर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या