मध्य प्रदेशमध्ये 116 टक्क्यांनी वाढले कोरोनाचे रुग्ण, देशात तिसरा क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशमध्ये 82 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1402 वर पोहोचली आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 5 दिवसांत 116 टक्क्यांनी रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये मध्य प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो.

गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण 4500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. या तीनही राज्यातील 80 टक्के रुग्ण तीन जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात 89.27 टक्के आहेत. तर गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहरात राज्यातील 84.87 टक्के रुग्ण आहेत. तसेच मध्य प्रदेशच्या इंदुर, भोपाल आणि खरगौन शहरात 81.51 टक्के रुग्ण आहेत.