राष्ट्रीय महामार्गावर सुरू झाली वाहतूक, फास्टॅगच्या माध्यमातून कोट्यवधींचा टोल वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fastag-toll-plaza

कोरोनामुळे हिंदुस्थानला चांगलाच फटका बसला आहे. परंतु आता देश हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून कोट्यवधींचा टोल जमा झाला आहे

30 जून रोजी 97 कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे. तर जुलैमध्ये हा आकडा 103 कोटींवर पोहोचला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी मार्चमध्ये एका दिवशी 107 कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता.

1 जुलै रोजी 63 लाख फास्टॅग्सचा व्यव्हार झाला होता. जूनमध्ये सरकारला फास्टॅगच्या माध्यमातून 2 हजार 576 कोटींचा टोल मिळाला होता. हा टोल मे महिन्याच्या तुलनेत 21 टक्क्यांनी जास्त होता. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान सारखी राज्य सोडल्यास इतर भागात फास्टॅग विक्री सामान्य स्वरुपात सुरू झाली आहे.

कोरोनाचा टोललाही फटका

मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी एका महिन्यात 19 कोटी 3 लाख फास्टॅग्सचा व्यवहार झाला होता. परंतु एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा आकडा 16 कोटी व्यवहारांवर पोहोचला. त्यामुळे टोलच्या माध्यमातून केवळ 2 हजार 776 कोटींचा महसूल मिळाला.