डास चावल्याने देखील होऊ शकते कोरोनाची लागण? काय म्हणाले शास्त्रज्ञ वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यामागील कारणांबद्दल अनेकजणांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, डासांमुळे कोरोचा संसर्ग पसरला जाऊ शकतो. मात्र आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना संकटात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डास चावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही याआधी डासांमुळे कोरोचा संसर्ग परसात नसल्याचे सांगितले होते. आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या कॅन्सस युनिव्हर्सिटीच्या सायंटिफिक रिपोर्ट्स या संशोधन जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. याचे सह-लेखक स्टीफन हिग्ज म्हणतात की, ‘आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्याला वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करून आमच्या अभ्यासात सिद्ध केले आहे. या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, डासांच्या तीन प्रजाती आहेत. ज्यात कोरोना विषाणू असल्यासही त्यांच्या द्वारे याचा पसार होत नाही.’