निर्दयी मातेचा क्रूरपणा, नवजात अर्भकाला टाकले कचराकुंडीत

685

एका निर्दयी मातेने नवजात अर्भकाला कचराकुंडीत टाकून पळ काढल्याचा प्रकार विरार येथील ग्लोबल सिटी -नारंगी मार्गावर घडला आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या या अर्भकाला विरार येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वाती सोलापूरकर आणि सुनील खानोलकर हे गुरुवारी ग्लोबल सिटी-नारंगी मार्गावरून जात असताना कचराकुंडीनजीक त्यांना एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी कचराकुंडीत पाहिले असते तिथे एक अर्भक आढळून आले. ही माहिती परिसरात पसरल्यानंतर कचराकुंडीजवळ स्थानिक रहिवाशांची मोठी गर्दी झाली. पोलीसही घटनास्थळी आले. त्यानंतर या नवजात अर्भकाला तातडीने उपजिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते अर्भकाला कचराकुंडीत फेकणाऱया निर्दयी मातेचा कसून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या