ऐकावं आणि पहावं ते नवलच! दिंडोशीत उंदीरमामाने पळवले 10 तोळे सोने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवल वाटेल अशी घटना आज मुंबईच्या दिंडोशीत घडली. चोराने नव्हे, तर चक्क एका उंदीरमामाने दहा तोळे सोने पळवून नेले. या उंदराचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये पैद झाले आणि ते पाहून पोलिसांना हे सोने पुन्हा शोधून काढण्यात यश मिळाले. पोलिसांनी सोन्याचे दागिने असलेली पिशवी कचऱयाच्या ढिगाऱयाजवळील बिळातून बाहेर काढली.

दिंडोशी येथे राहणाऱया सुंदरी प्लानिबेल यांनी मुलीच्या लग्नासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपल्याजवळील दहा तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांपूर्वी दागिने घेऊन त्या बँकेत जात होत्या. मार्गात रामनगर येथे कमरेवर मूल घेतलेली एक भिकारी महिला त्यांच्याजवळ आली. सुंदरी यांनी त्या महिलेला वडापाव विकत घेऊन दिले. घाईघाईत त्यांनी दागिन्यांची पिशवी वडापावच्या पिशवीत ठेवली.

बँकेत पोहोचल्यानंतर सुंदरी यांना आपली दागिन्यांची पिशवी जवळ नसल्याचे दिसून आले. भिकारी महिलेला वडापाव देताना त्याच पिशवीत आपण दागिन्यांची पिशवी ठेवल्याचे त्यांना आठवले. त्या पुन्हा रामनगर येथील त्या ठिकाणी आल्या, पण ती महिला तिथे दिसली नाही. सुंदरी यांनी दिंडोशी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.

दिंडोशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, सूरज राऊत, माईंगडे, कांबळे, जाधव, पोटे यांच्या पथकाने शोध सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यावरून भिकारी महिला पोलिसांना सापडली, परंतु तिच्याजवळ पिशवी नव्हती. पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक उंदीर ती पिशवी ओढत कचऱयाच्या ढिगापर्यंत गेल्याचे पोलिसांना दिसले. त्याआधारे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. उंदराने पिशवी ओढत एका बिळामध्ये नेली होती. पोलिसांनी बिळामधून ती पिशवी बाहेर काढली. त्यात सोन्याचे दागिने होते. ते नंतर सुंदरी यांना परत केले गेले. उंदराने वडापावच्या वासाने ती पिशवी पळवली होती.

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यावरून भिकारी महिला पोलिसांना सापडली, परंतु तिच्याजवळ पिशवी नव्हती. पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक उंदीर ती पिशवी ओढत कचऱयाच्या ढिगापर्यंत गेल्याचे पोलिसांना दिसले.