दिवाळीच्या सुट्टीत ‘या’ चित्रपटांची मेजवानी

1560

दिवाळीच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधून दरवर्षी बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट रिलीज होत असतात. सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल म्हणून बरेच निर्माते दिवाळीच्या सुट्टीत त्यांचे चित्रपट रिलीज करताता. त्यामुळे चित्रपट चाहत्यांना फराळासोबत चित्रपटांची धमाकेदार मेजवानी मिळते.  यंदाही दिवाळीच्या मुहुर्तावर तब्बल पाच चित्रपट रिलीज होणार आहेत. यातील तीन हिंदी तर दोन मराठी चित्रपट आहेत.

 हाउसफुल 4

अक्षय कुमारच्या चाहत्यांची यंदाची दिवाळी अगदी जोरदार असणार आहे. कारण दिवाळीच्या मुहुर्तावरच अक्षयचा बहुप्रतिक्षित  हाउसफुल 4 हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या याआधीच्या तीन भागांनी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. त्यामुळे चाहते चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोबर 2019 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा झळकणार आहेत.

सांड की आंख

हरयाणातील शार्पशूटर्स चंद्रो आणि प्रकाश तोमर यांच्या जीवनावर आधारित सांड की आंख हा चित्रपट देखील सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा सिनेमा बिग बजेटजरी नसला तरी चरित्रपट असल्यामुळे प्रेक्षक नक्कीच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देतील.  या चित्रपटात भूमी पेडणेकर, तापसी पन्नू आणि प्रकाश झा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट देखील 27 ऑक्टोबरला हाऊसफुल 4 ला टक्कर देणार आहे.

मेड इन चायना

सेक्स कॉमेडीच्या गटात मोडणारा राजकुमार रावचा मेड इन चायना हा चित्रपट देखील 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. एक अयशस्वी गुजराती व्यावसायिक चीनमध्ये जाऊन तेथील ‘वायग्रा’ सारख्या औषधाचा व्यवसाय करण्यासाठी हिंदुस्थानात परततो. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे

खारी बिस्किट

‘दुनियादारी’, प्यार वाली लव्ह स्टोरी ‘आणि’ जोगवा ‘या असे सुपरहिट चित्रपट देणारे निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव आपल्या चाहत्यांना ‘खारी बिस्किट’ या चित्रपटाची गोड ट्रीट देण्यास तयार आहेत. बालकलाकार वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. अंध बहिणाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झगडणारा भाऊ यांची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुट्टीत म्हणजेच 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

ट्रिपल सिट

बिग बॉस फेम शिवानी सुर्वे हिचा बहुप्रतिक्षित ट्रिपल सिट चित्रपट हा चित्रपट देखील दिवाळीत रिलीज होणार आहे. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटात शिवानीसोबत अंकुश चौधरीआणि पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या