
सरसंघचालक यांनी विजयादशमीदिनी केलेले भाषण खोटे आणि अर्धसत्य आहे अशी टीका खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच देशात मुस्लिमाची लोकसंख्या वाढत नसून त्यांचा जन्मदर घटला आहे असे ओवैसी म्हटले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर बेरोजगारी वाढली असेही ओवैसी म्हणाले.
1. As usual, RSS Mohan’s speech today was full of lies & half-truths. He called for a population policy & repeated the lie that Muslim & Christian population has increased. Muslim population growth rate has had the sharpest decline among all. There’s no ‘demographic imbalance’1/n
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 15, 2021
ओवैसी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या वाढली असे भागवत यांनी म्हटले परंतु देशात मुस्लिमाचा जन्मदर घटला आहे. देशात बालविवाह आणि स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढले आहे. बालविवाहात 84 टक्के बालक हिंदू आहेत. 2001 ते 2011 दरम्यान मुस्लिम लिंग गुणोत्तर प्रमाण हे 936 वरून 351 वर गेले आहे. तर हिंदु समजातात एक हजार पुरुषांमगील स्त्रियांचे लिंग गुणोत्तर प्रमाण 931 वरून 939 पर्यंत वाढले आहे असे ओवैसी म्हणाले.
हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत, त्यात पंतप्रधान फक्त भजी विकण्याचे वचन देत आहेत. जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 मुळे बेरोजगारी दर 21.06 टक्क्यांवर पोहोचल्याचेही ओवैसी यांनी सांगितले आहे.



























































