मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, 12 महिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये एका बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. त्यात 12 महिलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये 12 महिला दोन रिक्षांमध्ये पोषण आहाराचे सामान घेऊन कामाच्या ठिकाणी जात होता. तेव्हा एक बसचा आणि या रिक्षांची धडक झाली. या अपघातात 12 महिलांचा मृत्यू झाला. तसेच एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. त्यात एका चालकाचाही समावेश आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शोक्त व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.