मध्य प्रदेशमध्ये कॉम्प्युटर बाबाच्या आश्रमावर बुलडोझर, काँग्रेससाठी केला होता प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशचे सुप्रसिद्ध कॉम्प्युटर बाबाच्या आश्रमावर प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. तसेच कॉम्प्युटर बाबासह 6 जणांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीसाठी कॉम्प्युटर बाबाने काँग्रेससाठी प्रचारही केला होता. भाजपने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचा टीका माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केली आहे.


कॉम्प्युटर बाबाचा इंदौरमध्ये आश्रम होता. हा आश्रम बेकायदेशीर असल्याने ही कारवाई केली आहे. ज्या जमिनीवरून हा आश्रम हटवण्यात आला आहे, त्या जमिनीची किंमत तब्बल 80 कोटी आहे. बाबाचा हा आश्रम 40 एकर जमिनीवर होता. आता या जमिनीवर एक मोठी गोशाळा उभारण्यात येणार आहे. तसेच या भागात धार्मिक स्थळाचा विकास होणार असून जिल्हा प्रशासनाकडून योजना बनवण्याचे काम सुरू आहे.