निवडणुकांसाठी बनावट नोटा छापणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। भोपाळ

मध्य प्रदेशमधील होशंगाबाद आणि राजगढ येथे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे टोळके विधानसभा निवडणुकांमध्ये या पैशांचा वापर करणार होते. यासाठी त्यांनी नकली नोटा छापण्याचा कारखानाच उभा केला होता. यावेळी पोलिसांनी ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा व नोटांची छपाई करणारे मशिनही जप्त केले आहे.

दरम्यान, आरोपींनी 40 लाख रुपयांच्या बनावट नोटा आधीच बाजारात खपवल्या आहेत. या टोळक्याला 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना या नोटा छापून द्यायच्या होत्या. पण पोलिसांनी त्याआधीच या कारखान्यावर छापा घातला आणि कोट्यावधी रुपयांसह एक कार व अत्याधुनिक शस्त्रास्त्र जप्त केली. भोपाळमधील एका बड्या पक्षाने टोळक्याला बनावट नोटा छापण्याचे कंत्राट दिले होते.