Video – मध्य प्रदेशमध्ये पुराचा कहर, चार जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

मध्य प्रदेशमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पूर आला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

मध्य प्रदेशमधील पूर परिस्थिती गंभीर होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याशी फोनवर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.


मध्य प्रदेशच्या शिवपुरी, श्योपुर, ग्वालियर आणि दतिया या जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरू अहे. त्यामुळे 1 हजार 171 गावांमध्ये पूर आला आहे.


22 गावांतून अनेक ग्रामस्थांना बाहेर काडून त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे. शिवपुरी श्योपुर ग्वालियर आणि दतिया जिल्ह्यात मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

एनडीआरएफच्या टीमने आतापर्यंट 1600 ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढले आहे. अजूनही 200 गावात पूराचे पाणी ओसरले नसून तिथे बचाव कार्य सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या