Video: नागीण डान्स करताना तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये गणपती विसर्जनावेळी नागीण डान्स करताना एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण नागीण डान्स करत असताना त्याला कार्डीयक अरेस्ट आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून गणेश विसर्जनावेळी घडलेल्या या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

व्हिडीओत दोन व्यक्ती नागीणच्या संगितावर डान्स करताना दिसत आहेत. दोघे जण जोशात डान्स करत असताना त्यातील एकजण अचानक उडी मारतो आणि खाली कोसळतो. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.