खासदार संभाजीराजे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट

2158

खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करून या भेटीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन याविषयी चर्चा केली, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या