शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत मोटरसायकलने पोचले भडगाव बुद्रुक गावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कोणीही खासदार पोहोचला नव्हता त्या भडगाव बुद्रुकमधील अतिशय दुर्गम अशा धनगर वाडीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मोटारसायकलने प्रवास करून आणि पुढे पायी जाऊन धनगर बांधवांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या चिऱ्याचा वहाळ धनगर वस्तीतील स्मशानभूमी शेडचे भूमीपूजन राऊत यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, सरपंच प्रणिता गुरव, उपसरपंच बाबी गुरव यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या वर्षभरात कोणत्याही परिस्थितीत धनगरवाडीला जोडणाऱ्या पुलाचे काम मंजूर करण्याचे आश्वासन वाडीतील ग्रामस्थाना त्यांनी दिले. तसेच खासदार विकास निधीतून मंजूर विंधन विहिरीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाडीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.