
राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकारी यांना सर्व्हेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण सुरू आहे. पोलिसांच्या दडपशाीने ग्रामस्थांचा विरोध चिरडून विनाकारण ग्रामस्थांना अटक करण्यात येत आहे.
बारसू – सोलगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत बुधवारी सकाळी भेट देणार आहेत.
























































