राज्य व देश सर्वोत्तम करण्याचे स्वप्न बाळगा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार हे महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते आहेत. भविष्यातील जबाबदारीची परीक्षा देखील जिद्दीने ते पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवनात गौरव करण्यात आला.

प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले की, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, दीपक करवा, विशाल नरवाडे, राहूल लक्ष्मण चव्हाण, नेहा दिवाकर देसाई, अभयसिंह देशमुख, यशप्रताप श्रीमल, अश्विनी वाकडे, सुमित महाजन, योगेश कापसे, गौरी नितीन पुजारी, शंतनू अत्रे, अनिकेत सचान, अजहरोद्दीन काजी जहिरोद्दीन काजी, निमिश पाटील, महेश गीते, अमितकुमार महातो, प्रणोती संकपाळ, सुमित जगताप, प्रसन्ना लोध, अंकिता वाकेकर, स्वप्निल जगन्नाथ पवार, अभिषेक दुधाळ, डॉ.प्रदीप डुबल, करूण गरड, हृषीकेश देशमुख, निखिल कांबळे, संग्राम शिंदे, सत्यजित यादव, सुनील शिंदे या उपस्थित यशस्वी उमेदवारांचा गौरव चिन्ह आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यशस्वी उमेदवारांच्या वतीने नेहा भोसले आणि मंदार पत्की यांनी मनोगत व्यक्त केले.

गौराई आली माझ्या दारी…

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर मंगळवारी गौरीचे घरोघरी आगमन झाले. आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकजण गौरी घरी बसवतात, दुसऱ्या दिवशी महानैवेद्य होतो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन होते.