
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स ही वेबसिरीज प्रंचड गाजत आहे. या वेब सिरीजमधील हॉट प्रणयदृश्ये, कलाकारांचे अभिनय, भडक डायलॉग्स या सगळ्यामुळे ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. हिंदुस्थानी क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार एम.एस धोनी याला देखील ही वेबसिरीज आवडली असून यातील अभिनेत्री राजश्री देशपांडेची भूमिका त्याला आवडली आहे. धोनी राजश्रीकडे तिच्या अभिनयाचे कौतुक केले आाहे.
@msdhoni loved Sacred Games .. hmmm https://t.co/L168OwSnUK
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 27, 2018
राजश्रीने सोशल मीडियावरून धोनीसोबचा फोटो शेअर करत याबाबत सांगितले आहे. ‘सेक्रेड गेम्समधील माझे काम एम.एस. धोनीला फार आवडले आहे.’ अशी पोस्ट तिने या फोटोसोबत शेअर केली आहे. तिची ही पोस्ट या वेबसिरीजचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील शेअर केली आहे.























































