
सामना प्रतिनिधी । मुंबई
फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, ३० मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थी वेबसाईटवरून विषयनिहाय मिळालेले गुण पाहू शकतील तसेच या माहितीची प्रिंटआऊटही काढू शकतील. मोबाईल एसएमएसद्वारेही विद्यार्थ्यांना निकाल कळणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
येथे पहा निकाल
- www.maharesult.nic.in
- www.result.mkcl.org
- www.maharashtraeducation.com
- http://www.knowyourresult.com
- hscresult.mkcl.org
- बीएसएनएल युजर्स ५७७६६ या क्रमांकावर मेसेजही पाठवू शकता. मेसेज पाठविण्यासाठी टाईप करा. mhhsc<space><seat no>



























































