वीज कर्मचाऱ्यांच्या बोनसचा आज निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱया तब्बल 86 हजार वीज कामगारांच्या बोनसचा आज निर्णय होणार आहे. वीज कामगार संघटनांनी कामगारांना बेसिकच्या 8.33 टक्के एवढा बोनस देण्याची मागणी केली आहे. एवढा बोनस देण्यास वीज कंपन्यांनी नकार दिल्याने कामगारांच्या बोनसचा प्रश्न ऊर्जा मंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज कामगारांना किती बोनस द्यावा, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उद्या मंगळवारी दुपारी बैठक होणार आहे.

या बैठकीला तिन्ही वीज कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत. मागील वर्षी वीज कामगारांना सरसकट साडेतेरा हजार रुपये एवढा बोनस दिला होता. त्यामुळे आता किती बोनस जाहीर होतोय याकडे सर्व कामगारांच्या नजरा लागल्या आहेत.