महावितरणला स्वस्तात 500 मेगावॅट वीज मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणला आता स्वस्तात वीज मिळणार आहे. राज्यात पिंवा राज्याबाहेर 500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत महावितरणने मे महिन्यात निविदा काढल्या होत्या. त्यानुसार अॅकमे सोलर पॉवरने आणि रिन्यू पॉवरने 500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणारी वीज पुढील 25 वर्षांसाठी महावितरणला प्रतियुनिट 2 रुपये 42 पैसे आणि 2 रुपये 43 पैसे दराने पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात महावितरणसह राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. तसेच सदरची वीज महागडी असल्याने महावितरणसह सर्वच वीज पंपन्यांनी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यानुसार महावितरणने आतापर्यंत जवळपास साडेअकरा हजार मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत, तर मे महिन्यात सोलर फोटोव्होल्टाक तंत्रज्ञानाच्या आधारे 500 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारून वीज पुरवठा करण्याबाबत निविदा काढल्या होत्या. त्याला सौर प्रकल्प उभारणाऱया कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अॅकमे पॉवरने 300 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारून तेथे तयार होणारी वीज सर्वात कमी म्हणजे 2 रुपये 42 पैसे दराने, तर रिन्यू पॉवरने 200 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारून 2 रुपये 43 पैसे प्रतियुनिट दराने वीज पुरवठा करण्याबाबत निविदा भरल्या होत्या. त्याची दखल घेत महावितरणने सदर दोन्ही पंपन्यांना सौर प्रकल्प उभारण्याबाबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंतचा सर्वात कमी वीज दर

अॅकमे सोलर पॉवर आणि रिन्यू पॉवरने महावितरणला तब्बल 500 मेगावॅट वीज 2 रुपये 42 पैसे प्रतियुनिट दराने वीज पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सदरचा वीज दर आतापर्यंतचा सर्वात कमी दर ठरला आहे. याआधी महानिर्मितीने टाटा पॉवरची उपपंपनी असलेल्या टीपी शौर्यला सौर प्रकल्प उभारण्याचे टेंडर दिले असून त्यामध्ये तयार होणारी वीज 2 रुपये 51 पैसे प्रतियुनिट दराने महानिर्मितीला मिळणार आहे.