ओला, उबेरच्या धर्तीवर एसटीचे छावा राईड ऍप

ओला, उबेरच्या धर्तीवर एसटी महामंडळाचे स्वतःचे ऍप बनवले आहे. ‘छावा राईड’ असे नाव या ऍपला देण्यात आले आले. लवकरच त्याला अंतिम मान्यता घेऊन ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. ओला, उबेरसारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या अनेक खासगी कंपन्या आज कार्यरत आहेत. त्या कंपन्या भरमसाट नफा कमावून प्रवासी आणि चालकांना वेठीस धरतात. त्यांच्या जोखडातून प्रवाशांना मुक्त करण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘छावा राईड ऍप’ बनवण्यात आले आहे. या ऍपला ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’, ‘छावा राईड’ यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. ‘छावा राईड ऍप’ हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते सुरू केले जाणार आहे.