जिल्हापरिषद शाळांमध्ये 600हून अधिक पदे रिक्त

470

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 197 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे जिल्हापरिषदेत एकच खळबळ उडाली.जिल्ह्यात शिक्षकांची रिक्तपदे असताना,शून्य शिक्षकी शाळांची समस्या उद्भवली आहे.आंतरजिल्हा बदलींमुळे 600 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणाचे तीन तेरा वाजणार आहेत.

रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक शाळांमध्ये एक शिक्षक तर काही शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे गोंधळ उडाला.राजापूर तालुक्यात शाळेच्या विद्यार्थी शाळेत आले, मात्र शिक्षकच नाहीत. अशी अवस्था होती. शिक्षकच नसल्यामुळे जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे भवितव्य अंधातरी आहे. बुधवारी शिक्षकांच्या बदल्यांचे समुपदेशन होणार असून या 197 जागा रिक्त दाखवल्या जातील.शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे आता उपलब्ध शिक्षकांवर शाळा सुरु ठेवण्याची तारेवरची कसरत शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.जिल्हापरिषद शाळांचा दर्जा घसरत असताना शिक्षक टंचाईची नवी समस्या निर्माण झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या