एमटीडीसी ज्येष्ठांना घडवणार बाप्पाचे मोफत दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 गणेशोत्सवाच्या काळात ज्येष्ठांनाही रांगेत, गर्दीत उभे न राहता मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरमधील प्रसिद्ध गणपती पाहता यावेत, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी)ने 60 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत दर्शनाची सहल आयोजित केली आहे. ही सहल 7 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मुंबईचा पेशवे (विलेपार्ले), खेरवाडीचा राजा (वांद्रे), सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी), गणेश गल्ली (लालबाग), जीएसबी गणपती (वडाळा), टिळकनगर येथील सह्याद्री मित्र मंडळ गणपती आणि चेंबूरचा राजा (सिंधी कॉलनी) या मंडळांचा समावेश आहे. ठाण्यातील शिव समर्थ मित्र मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ, जनजागृती मित्र मंडळ, सूर्योदय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव आणि पानशिल सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन पर्यटक करणार आहेत. पुण्यात पर्यटक तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, थमडी जोगेश्वरी गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री कसबा गणपती आणि केसरी वाडा गणपतीच्या प्रसिद्ध पंडालला भेट देणार आहेत.