पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्माता, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे लवकरच रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ या नव्या नाटकाचा शुभारंभ 24 जानेवारीला दुपारी 4 वाजता यशवंत नाटय़गृहात होणार आहे. या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि वादक पदार्पण करणार आहेत.

‘रिह्यू’ या नाटय़प्र्रकारांत मोडणाऱया फॉर्ममध्ये हे नाटक 25 कलावंत तंत्रज्ञाच्या ताफ्यात उभे करण्यात आले आहे. हा सर्व नाटय़प्रकार संगीत, नाटय़, नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून पुढे जातो. ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ नाटक म्हणजे मराठवाडय़ातल्या एका खेडेगावातून मुंबई-पुण्यात शिकून एका मोठय़ा फार्मास्युटिकल पंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा मूळच्या शेतकरीपुत्राची गोष्ट आहे, ज्याच्या नसानसात मराठवाडय़ाची भाषा, संस्कृती, लोककला, साहित्य, कविता, संतकाव्य आणि तिथल्या खेडय़ापाडय़ातल्या रूढी, प्रथा ठासून भरलेल्या आहेत. असा हा शेतकरीपुत्र अनेक वर्षांनी मराठवाडय़ातल्या आपल्या आडगाव या खेडय़ात जातो आणि तिथलं बदलतं लोकजीवन पाहून अस्वस्थ होतो आणि गतकाळातल्या समृद्धीचे रसिकतेने आणि रसभरीत भाषेने पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो, यावर नाटक आधारित आहे.