मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची बाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मुलायमसिंह यांच्या पत्नीचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुलायमसिंह यांना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या ऑगस्टमध्ये मुलायमसिंह यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना युरीन इन्फेक्शन झाल्याचे आढळले होते. मुलायमसिंह यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तसेच वयोमानानुसार त्यांना अशक्तपणाही जाणवत होता.