अकरावी ऑनलाईन प्रवेश दुसऱ्या फेरीसाठी 2 लाख 43 हजार जागा

मुंबई विभागात एसईबीसी कोटय़ाच्या 35 हजार 930 जागा रिक्त असून या जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. या जागा मिळून अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीसाठी एकूण 2 लाख 42 हजार 219 जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशामधील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू केली. दुसऱया गुणवत्ता यादीसाठी अल्पसंख्याक, व्यवस्थापन, इनहाऊस, कोटा, ऑनलाईन प्रवेशाच्या अशा मिळून रिक्त जागांचा अहवाल गुरूवारी जाहीर करण्यात आला आहे.

दुसऱया गुणवत्ता यादीसाठी

उपलब्ध जागा

अल्पसंख्यांक – 70,162
व्यवस्थापन – 13,710
इनहाऊस – 11,314
कोटा – 95,186
ऑनलाईन -1,47,033
एकूण -2,42,219

शाखानिहाय उपलब्ध जागा

आर्टस् – 28,390
काॅमर्स – 1,32,857
सायन्स – 76,175
एचएसव्हीसी – 4797

आपली प्रतिक्रिया द्या