
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून 400 वर नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून गेल्या 24 तासांत 629 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईने आता पुन्हा 600चा आकडा पार केला आहे. मुंबईत मंगळवारी 433 कोरोना रुग्ण सापडले होते. दरम्यान, आज 7 जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून लसीकरण मोहीमही वेगाने राबवली जात आहे. मुंबईत आतापर्यंत 83 टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे तर 44 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र असे असतानाही गेल्या काही दिवसांत दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोना झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. मात्र दोन्ही डोस घेतल्यामुळे अशांमध्ये सौम्य ते कोणतीही लक्षणे नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा अधिक वेगाने लसीकरण मोहीम राबवत या वर्षअखेरीपर्यंत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, वाढत्या संख्येमुळे महापालिका सतर्प झाली असून मुंबईकरांनी येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
n मुंबईत दिव्यांग, वृद्ध, फेरीवाले, तृतीयपंथी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात असून आज 35 अंथरुणाला खिळलेल्या, 110 फेरीवाले तर परदेशी जाणार्या 99 जणांचे लसीकरण करण्यात आले. मुंबईतील एपूण 467 पेंद्रांवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

































































