
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल आला. बॉम्बशोधक व नाशक विभागाने तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे उघड झाले. सहार पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून बॉम्बच्या अफवेचे ई-मेल येण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. गेल्याच आठवडय़ात मुंबई महानगर पालिका आणि पुणे महानगर पालिकेला धमकीचा ई-मेल आला होता. शनिवारी सकाळी टर्मिनल 2 च्या फीडबॅक ई-मेलवर एक मेल आला. तपासणी केली असता तो धमकीचा ई-मेल अफवा असल्याचे उघड झाले. तो ई-मेल विपीएन नेटवर्कचा वापर करून पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे.





























































