जेव्हा Amazon चे मालक स्वतः पॅकेज डिलिव्हर करतात…

968

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये ते अ‍ॅमेझॉनचे एक पॅकेज डिलिव्हर करताना दिसत आहेत. 115 बिलियन संपत्ती असलेल्या जेफला हे काम करताना पाहून अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत. जेफ हे तीन दिवशीय हिंदुस्थानी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील मोठे उद्योजग आणि बॉलीवूड कलाकारांची भेट घेतली आहे.

जेफ यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘अ‍ॅमेझॉनने डिलिव्हरी पॉईंट म्हणून हिंदुस्थानातील हजारो किराणा दुकानांशी संबंध जोडले आहेत. हे ग्राहकांसाठी आणि दुकान मालकांसाठी ही चांगले आहे. जेणेकरून त्यांना अतिरिक्त पैसे कमावता येऊ शकतात. मुंबईच्या डिलिव्हरी पॉईंटवर जाण्याची संधी मिळाली. धन्यवाद, अमोल… मला एक पॅकेज डिलिव्हर करू दिल्याबद्दल. ‘

आपली प्रतिक्रिया द्या