प्रायोगिक रंगभूमीचा ‘आविष्कार’ हरपला!

354

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने प्रायोगिक चळवळीचा आधारवड हरपला आहे. अरुण काकडे हे ’आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी दिवाणखान्याबाहेरची, वैचारिक नाटकं रंगमंचावर आणली. रंगमंचीय सादरीकरणाची पारंपरिक चौकट मोडली. स्वतःच्या अंगी अभिनयाचे गुण असूनही पडद्यामागील सूत्रधार बनण्याची भूमिका साकारली. म्हणूनच कदाचित प्रायोगिक रंगभूमी चळवळ जिवंत राहिली.

प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काचा रंगमंच मिळावा हे काकडे काका यांचे स्वप्न होते. दहा वर्षे लाल फितीमध्ये अडकलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंच निर्मितीचा शुभारंभ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात झाला. पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या पाचव्या मजल्यावरील जागेत अद्ययावत रंगमंच उभारण्यात येत आहे. मात्र ते बघायला काकडे काका हयात नाही, अशी भावना नाट्यक्षेत्रात आज उमटली. अभिनेते सुमीत राघवन, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, चंद्रकांत कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, सुनील बर्वे, प्रेमानंद गज्वी, सोनाली कुलकर्णी आदींनी अंत्यदर्शन घेतले.

सूत्रधाराच्या भूमिकेत रमला जीव!

अरुण काकडे यांनी पुण्यातून रंगभूमीवरील करीअरला सुरुवात केली. भालबा केळकर यांच्यामुळे त्यांची नाळ नाटकाशी जुळली. पुढे ते मुंबईकडे वळले. त्याच काळात विजया मेहता, अरकिंद देशपांडे, विजय तेंडुलकर, माधक काटके या रंगकर्मींनी ‘रंगायन’ ही संस्था सुरू केली होती. ते ‘रंगायन’द्वारे वेगवेगळी नाटके करीत असत. या संस्थेशी अरुण काकडे जोडले गेले. त्यांनी विजय तेंडुलकरांच्या ‘मी जिंकलो मी हरलो’ या नाटकात भूमिका केली. तेंडुलकरांच्याच ‘शांतता कोर्ट चालू आहे’मध्येही काम केले. पुढे ‘रंगायन’मध्ये वाद होऊन संस्था फुटली. त्यानंतर अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी 1971 ‘आकिष्कार’ ही नकी नाटय़संस्था स्थापन केली. त्यावेळी काकडे या मंडळींच्या खांद्याला खांदा लाकून उभे राहिले. या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून काकडे काका म्हणजे ‘आकिष्कार’ हे समीकरणच बनून गेले. ‘आकिष्कार’ने छबिलदास शाळेची चळकळ उभी केली. या चळकळीतून अनेक रंगकर्मी घडले. काकडे काका या चळवळीसाठी अहोरात्र झटले. दिवानखाण्याबाहेरची वैचारिक नाटकं आणि रंगमंचाच्या पारंपरिक मांडणीत बदल करण्याचा प्रयोग ते गेली 60 वर्षे करीत आहेत.

12 महिन्यांत 12 नवीन नाटके

मृदुभाषी काकडेंनी रंगमंचावर चमकण्याचा मोह टाळला. त्यांनी कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहणे पसंत केले. त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी आकिष्कारने मोठ्या थाटात साजरी केली. त्या वर्षी काकडे काकांनी 12 महिन्यांत 12 नवीन नाटके ‘आकिष्कार’तर्फे रंगमंचाकर आणली. अखेरपर्यंत काकडे यांनी प्रायोगिक रंगभूमीचा घेतलेला वसा सोडला नाही. जागेची समस्या, विस्कटलेले आर्थिक गणित यांचा बाऊ न करता ‘आकिष्कार’ चे कार्य पुढे नेत राहिले. काही दिवसांपूर्वी ‘आकिष्कार’ आणि दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थांनी एकत्र येऊन नव्या संगीत नाटकाची घोषणा केली होती. 89 वर्षे वयाच्या काकडे काकांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक उभे राहत होते.

काकडे यांनी 94 क्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी ‘अमका’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. काकडे यांना ‘संगीत नाटक अकादमी’, ‘ध्यास-सन्मान’, बोरिवली नाटय़शाखेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रंगभूमीचे राजे

काकडे काका म्हणजे खऱया अर्थाने रंगभूमीचे ‘किंग’ होते. त्यांनी गेल्या साठ वर्षांत किती नट घडवले याची गणना करता येणार नाही. मराठी रंगभूमी हे ऋण कधीच विसरणार नाही. मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून काकडे काका यांनी नाटय़ चळवळीला वाहून घेतले. त्यांच्यासारखी माणसे खूप दुर्मिळ आहेत.- मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते

‘वाडा चिरेबंदी’सह त्रनाट्यधारेचा इतिहास!

1994 सालच्या आविष्कार निर्मित त्रिनाटय़धारेत ‘वाडा चिरेबंदी’ सादर झाले. ती हिंमत फक्त अरुण काकडे आणि चंद्रकांत कुलकर्णी हेच करू शकले. हा भव्य प्रोजेक्ट होता, खर्च अफाट होता. हे साध्य होऊ शकले त्याला कारण म्हणजे अरुण! म्हणूनच रंगभूमीवर त्रिनाटय़धारेची ऐतिहासिक घटना घडली. त्याचे ऋण शब्दातीत आहे. माझा जवळचा मित्र हरपला. अरुण म्हणजे रंगभूमीचा नुसता कार्यकर्ता नव्हता, तर अख्खे विद्यापीठ होता. पुण्या, मुंबईचे वेगवेगळे ग्रुप बांधून ठेवणारा दुवा होता. त्याच्यासारखी माणसे दुर्मिळ आहेत. त्याच्या खांद्यावर अवघी रंगभूमी उभी राहिली.- महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार

प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड हरपला!

मराठी प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड असणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने रंगभूमीसाठी सातत्याने सकारात्मक चळवळ करणारा खरा कार्यकर्ता हरपला. भालबा केळकर या गुरूपासून सुरू झालेला काकडे काकांचा रंगप्रवास आज थांबला. सतत नाटकाचा ध्यास घेतलेले व नवनवीन युवकांना संधी देत त्यांच्या माध्यमातून रंगभूमीवरील नावीन्यतेचा शोध घेणे हे त्यांचे ध्येय होते. – विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

संस्था कशी चालवायची शिकवले

प्रायोगिक नाटय़ चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये अरुण काकडे यांचा मोलाचा वाटा आहे. अलीकडे आजारी पडण्यार्प्वीपर्यंत काकडे नाटकाच्या प्रयोगाला आवर्जून जायचे. एवढे नाटकाचे व्यसन त्यांना जडले होते. छबिलदासमधील प्रायोगिक नाटय़ चळवळ बंद पडली तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणे धुंडाळून प्रायोगिक नाटकासाठी प्रयत्न केले. आधीची पिढी आणि आताच्या पिढीतील दुवा म्हणजे अरुण काकडे. अरुण काकडे परिपूर्ण जीवन जगले. प्रायोगिक रंगभूमीला थिएटर मिळावे यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले. काकडे काकांकडे बघतच आम्ही पुढे गेलो. संस्था कशी चालवायची याचा उत्तम आदर्श काकडे काका होते. त्यांनी रंगभूमीला दिलेल्या योगदानामुळे अरुण काकडे कायम लोकांच्या स्मरणात राहतील. – प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ नाटककार

प्रायोगिक चळवळीचे काय होणार?

अविष्काराशी संबंध येण्याचे मुख्य कारण म्हणजे अरुण काका होते. 1996 पासून अविष्काराशी जोडलो गेलो. जी नाटकं अविष्कारसोबत केली त्याचे सूत्रधार अरुण काका होते. नवीन रंगकर्मींना आधार देणे, व्यासपीठ देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम अविष्कार करायची, त्यामध्ये मोठा हात काकडे काकांचा होता. केवळ मुंबईतील रंगभूमीसाठी नाही तर नाशिक, पुणे असे जेथे जेथे म्हणून प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे तरुण होते त्याच्या पाठिशी काकडे काका आयुष्यभर उभे राहिले. शेवटपर्यंत अरुण काका प्रयोगाला उपस्थित राहायचे. ही फार अवघड गोष्ट आहे त्यासाठी समर्पित माणसं लागतात. आता पुढची परिस्थिती फार अवघड वाटते. काकडे काकांच्या जाण्याचे मोठी पोकळी प्रायोगिक रंगभूमीमध्ये निर्माण झाली आहे. – गिरीश पतके, दिग्दर्शक

आपली प्रतिक्रिया द्या